Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६
मालपूर (ता. साक्री) येथील घनश्याम लाडे यांची CISF मध्ये निवड – समाजाकडून सत्कार
मालपूर (ता. साक्री) येथील युवक घनश्याम भाऊ लाडे यांची SSC मार्फत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF – Central Police Force) मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल परिसरात तसेच समाजात आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विकास भाऊ खेडकर, भोई समाज युवा मंच सटाणा तालुका अध्यक्ष विलास भाऊ मोरे, ताराचंद मोरे (सामाजिक कार्यकर्ते, झोडगे), अमृत भाऊ लाडे (मालपूर), निलेश सोनवणे (भोई समाज युवा कार्यकर्ते, अमळनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी घनश्याम लाडे यांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील सेवाभावी व देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. “ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर केंद्रीय सेवेत यश संपादन करणे हे इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या निवडीमुळे मालपूर गावासह भोई समाजाचा नावलौकिक वाढला असून, घनश्याम लाडे यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा