Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२६
Home
/
/
लोकशाहीचा उत्सव आणि समाजाचा गौरव: जळगावात नवनिर्वाचित भोई समाज नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
लोकशाहीचा उत्सव आणि समाजाचा गौरव: जळगावात नवनिर्वाचित भोई समाज नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
जळगाव | प्रतिनिधी (प्रा.जगदीश ढोले):
"कष्टकरी आणि प्रामाणिक" अशी ओळख असलेल्या भोई समाजाने यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाचे औचित्य साधून भोई समाज युवा फाउंडेशन, जळगाव तर्फे जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी, १ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला.प्रिंप्राळा
परिसरातील खंडेराव नगर, संत भीमा भोई चौक येथे आयोजित या सोहळ्याने समाजाच्या राजकीय आणि सामाजिक अस्मितेची नवी चुणूक दाखवून दिली.
मान्यवरांची मांदियाळी आणि उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक तथा आमदार पुत्र श्री. विशाल भोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत शिरोमणी संत भीमा भोई यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. एस.ए.भोई सर होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जळगावचे उपमहापौर श्री. मनोज चौधरी, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा अध्यक्ष अतुल बारी, शहराध्यक्ष किरण शिवदे, ज्येष्ठ समाजसेवक साहेबराव भोई, सीताराम भोई, शिवदास भोई, यशवंत शिवदे आणि महारू शिवदे यांसारखे दिग्गज उपस्थित होते.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान
जळगाव महानगरपालिका, विविध नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या खालील लोकप्रतिनिधींचा शाल, पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला:
जळगाव मनपा:- सौ. कविता किरण शिवदे, श्री. सुरेश भाऊ सोनवणे, श्री. जाकीर भाऊ पठाण, सौ. माधुरीताई बारी.
शहादा नगरपालिका:- सौ. लताबाई उमाकांत शिवदे.
शिरपूर नगरपरिषद:- सौ. केतकी राजेश भोई.
अमळनेर नगरपरिषद:- सौ. पुष्पाताई पंकज मोरे (भोई), सौ. रूपालीताई विलास शिवदे.
मुक्ताईनगर परिषद:- मा. श्री. छोटुभाऊ भोई.
भडगाव नगरपालिका:- श्री. जगन शंकर भोई, श्री. देवा भाऊ अहिरे.
पिंपळनेर नगरपरिषद:- सौ.मनिषा संभाजी ढोले.
शैक्षणिक आणि सामाजिक गौरव
केवळ राजकारणच नव्हे, तर शिक्षणातही समाजाने घेतलेली झेप यावेळी कौतुकास्पद ठरली. डॉ. सौरभ ज्ञानेश्वर ढोले यांची मुंबई येथील नामांकित KEM Hospital मध्ये MD (Transfusion Medicine) या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच समाजभूषण कार्यकर्त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
प्रमुख भाषणे आणि मागण्या
उद्घाटक विशाल भोळे यांनी आपल्या भाषणात आश्वासन दिले की, "भोई समाज हा कष्टकरी समाज असून त्यांच्या अडीअडचणीत आमदार साहेब आणि आम्ही सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहू."
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी गणेश शिवदे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या वाढत्या राजकीय शक्तीकडे लक्ष वेधले आणि आगामी काळात भोई समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी केली. अध्यक्षीय भाषणात एस. ए. भोई सरांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना प्रामाणिकपणे लोकसेवा करून समाजाचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले.
नियोजनाचे यश
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा फाउंडेशनचे पदाधिकारी, खंडेराव नगर आणि पिंप्राळा भोई वाड्यातील बंधू-भगिनींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मुक्ताईनगरचे श्री. विनायक वाडेकर सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. किशोर ढोले सर यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा