Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२६
पालखेड येथील बदादे वस्तीत चौथा बिबट्या जेर बंद
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील बदादे वस्ती व परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आजही कायम आहे.मात्र वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश येत असून आत्तापर्यंत या बदादे वस्तीमध्ये ४ बिबटे वन विभागाला पकडण्यात यश आले आहे.
पालखेड औद्योगिक वसाहती जवळ बदादे वस्तीवर राहत असलेले गणेश संजय बदादे,योगेश बदादे, भावडू बदादे,यांच्या गट नंबर ५१५ येथे शनिवार दि.२८ रोजी पहाटेच्या सुमारास भक्षाच्या शोधात असणारा एक नर जातीचा बिबट्या वय दीड वर्ष जेरबंद झाल्याने नागरिकांनामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भटू बागुल वनरक्षक योगेश दळवी चालक बापू शिरसाट खुशाल गांगुर्डे सचिन गांगुर्डे यांनी घटनास्थळी येऊन या बिबट्याचा बंदोबस्त करून बिबट्याला नाशिक येथे पाठवण्यात आले आहे.आधीही या वस्तीमध्ये ३ बिबटे जेरबंद करण्यात आले आहे. एका मागे एक बिबटे पकडण्यात वन खात्याला यश येत असल्याने अजून या परिसरात किती बिबटे आहे हे मात्र सांगणे कठीण आहे.त्यामुळे या बदादे वस्तीतील व परिसरातील नागरिकांमध्ये कभी खुशी,कभी गम अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा