Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
करंजाळी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न- प्रयत्न,सातत्य,परीश्रम व संयम हि यशाची सुत्रे- चेतन ठाकरे
करंजाळी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न- प्रयत्न,सातत्य,परीश्रम व संयम हि यशाची सुत्रे- चेतन ठाकरे
पेठ प्रतिनिधी -
करंजाळी एम.जे.एम महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतिने करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी आणि भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार चेतन ठाकरे, हिरामण ठाकरे, प्राचार्य डी.पी.ठाकरे उपस्थित होते.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख एस. बी. वाघ आणि वाणिज्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक एस. सी. हाडस यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आवड -निवड व स्वत:मध्ये असलेली गुणवत्ता ओळखुण धेय्य व करिअरची निवड कशा प्रकारे करायची.अपयश,परीस्थिती ते स्किल डेवलप अशा विविध प्रश्नांवर भरदेत मोलाचे मार्गदर्शन चेतन ठाकरे यांनी केले.फक्त पदवी मिळवणे हा उद्देश न ठेवता जीवनात धेय्य साध्य करण्यासाठी व सामान्य परीस्थितुन विजय मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्तबद्ध नियमांचे पालन,परीश्रम व वेळेचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.यावेळी त्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्वही स्पष्ट केले. तसेच प्रामाणिकपणा, परिश्रम, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार या गुणांमुळेच व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते, असे प्राचार्य ठाकरे यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून राहणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व कौशल्याधारित घेण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे प्रा वाघ यांनी अधोरेखित केले. विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधींची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रांचा अभ्यास करण्याचे आवाहन हिरामण ठाकरे यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक पत्रकार चेतन ठाकरे ,प्रा.डी.पी. ठाकरे,हिरामण ठाकरे,प्रा.एस.बी.वाघ,आदि प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा