Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२६
ननाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज "महाराजस्व "समाधान शिबिर संपन्न
ननाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज "महाराजस्व"समाधान शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरास दिंडोरी येथील माननीय उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे, गोकुळ भाऊ झिरवाळ, तालुका कृषी अधिकारी नाना भोये, उपाधीक्षक भूमी अभिलेख गायकवाड , दुय्यम निबंधक, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये माननीय अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची प्रसिद्धी आणि शासकीय योजनांची माहिती सर्व ग्रामस्थांना पोहोचावी या उद्देशाने व्हॅन चे अनावरण या ठिकाणी करण्यात आले.
सदर शिबिरात महसूल विभागातर्फे सिंगल विंडो मध्ये विविध अर्जांचे स्वीकृती करून डिजिटल सातबारा वाटप, सातबारा मध्ये दुरुस्ती, भोगवटदार वर्ग दोन चे एक, संजय गांधी मार्फत लाभार्थ्यांना आदेश वितरण, प्रोटे शाखेबाबत डिजिटल रेशन कार्ड चे वाटप, सेतू मार्फत विविध दाखल्यांचे म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, वय आणि अधिवास प्रमाणपत्र, शालेय पोषण आहार, गर्भवती महिलांसाठी बेबी केअर किट इत्यादी विविध शासकीय योजनांचे लाभ ननाशी मंडळातील सर्व ग्रामस्थांना जागेवर उपलब्ध करून देण्यात आले.
या ठिकाणी सर्वप्रथम आप्पासाहेब शिंदे उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांनी या योजनेची व्याप्ती आणि आणि सविस्तर माहिती सर्वांना दिली. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी देखील महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना सदर शिबिरात त्यांच्या समस्या तसेच विविध अर्ज सादर करून सदर योजनेचे लाभ याच ठिकाणी उपलब्ध होतील याची ग्वाही दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैताली दराडे नायब तहसीलदार दिंडोरी यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी स्वाती आमले मंडळ अधिकारी ननाशी यांनी व्यासपीठावरील सर्व अधिकारी कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थ यांचे आभार मानले. सदर शिबिरात त्यांना ननाशी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा