Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
नाशिकमध्ये सव्वा कोटींची लाच मागणारे राज्य जीएसटी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त एसिबि च्या जाळ्यात
नाशिकमध्ये सव्वा कोटींची लाच मागणारे राज्य जीएसटी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त एसिबि च्या जाळ्यात
नाशिकमध्ये सव्वा कोटींची लाच मागणारे राज्य जीएसटी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त जाळ्यात
जीएसटी तपास लवकर पूर्ण करण्यासाठी १.२५ कोटींची लाच मागणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खाजगी इसमाला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. २० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना 'एसीबी'ने ही कारवाई केली.
जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करण्यासाठी सव्वा कोटींची लाच मागून तडजोडीअंती निश्चित झालेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये स्वीकारताना राज्यकर उपायुक्त आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे जीएसटी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (४७, दीप दर्शन, आदर्शनगर, चाणक्य पूरी रोड, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक), सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (५५, समर्थ ब्लॉसम अपार्टमेंट, चेरी गार्डन लेन, गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागे, नाशिक) आणि खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव (३६, कालिका पार्क, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराचे शहरातील दामोदर चौक भागात कार्यालय आहे. या ठिकाणी संशयित अधिकाऱ्यांनी जीएसटी कारवाई केली होती. या कार्यालयातील तपास लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य कर उपायुक्त पागे व सहायक राज्यकर आयुक्त दोंदे यांनी एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रादाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार दिली.
या तक्रारीच्या आधारे पथकाने केलेल्या पडताळणीत संशयित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोडीअंती एक कोटी रुपये निश्चित केले. आणि पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सापळा रचण्यात आला. पाथर्डी फाटास्थित वस्तू व विक्री कर कार्यालयात लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये पागे व दोंदे यांच्यावतीने खासगी व्यक्ती अमित जाधव याने स्वीकारले. यावेळी पथकाने त्याला रंगेहात पकडले. नंतर दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित राज्यकर उपायुक्त सोमनाथ पागे, सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित जाधव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने वस्तू व सेवा कार्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा