Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ मार्च, २०२६

कापडणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे सुशोभीकरण संदर्भात. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन सादर.....



प्रतिनिधी -: धुळे तालुक्यातील ऐतिहासिक कापडणे गावाच्या मुख्य ठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 1993 साला पासून पंचधातुने तयार केलेला पूर्णाकृती पुतळा आहे परंतु त्याच्या परिसरातील लोखंडी ग्रील 75 टक्के गजल्यामुळे मार्गाची विटंबना होण्याची दाट शक्यता आहे. महापुरुषाच्या स्मारकाचे पावित्र्य राखणे ही सर्वच गावकऱ्यांची व समाज बांधवांची जबाबदारी आहे त्याकरिता आज रोजी धुळे दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले साहेब आले असता त्यांच्याकडे निवेदनाद्वारे सुशोभीकरण संदर्भात सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात आली, त्या निवेदनाला कापडणे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्या सहीने शिफारस पत्र जोडण्यात आले होते, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, बापूसाहेब खलाणे यांनी देखील जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या लेटरहेडवर शिफारस पत्र रामदास आठवले साहेब यांना दिले, हे निवेदन देते वेळी, बापूसाहेब खलाणे, सामाजिक कार्यकर्ते समाधान सुनिल देवरे, भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल भामरे, दीपक डी भामरे, रवींद्र भामरे,भूषण ब्राह्मणे, सिद्धार्थ बागुल,विनोद डी भामरे मनोज भामरे, चेतन भामरे,विनोद म.भामरे, वैभव थोरात, संतोष भामरे, सरोज भामरे, अभिषेक भामरे,हितेश सैदाणे, अविनाश भामरे,यासह समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध