Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
दिंडोरीतील कायदा-सुव्यवस्था प्रश्नावर सोमवारी बैठक,प्रांत अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांचे आश्वासन
दिंडोरीतील कायदा-सुव्यवस्था प्रश्नावर सोमवारी बैठक,प्रांत अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांचे आश्वासन
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी घेण्यात येईल,असे आश्वासन प्रांत अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी दिले आहे.दिंडोरी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याबाबत दिंडोरीच्या नागरिकांकडून प्रांत अधिकारी डॉ.शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.या निवेदनात शहर व परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनानुसार,गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून काही भागात घरफोडी व दुचाकी चोरीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.तसेच रात्रीच्या वेळी काही संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळे शहरातील विविध भागात नियमित पोलीस गस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या शिवाय शाळा व महाविद्यालय परिसरात काही असामाजिक तरुणांचा वावर वाढत असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे.काही ठिकाणी विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या तक्रारी येत असल्याने शाळा व महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.शहर व परिसरात मटका,लॉटरी,गांजा,दारू व जुगार यांसारखे बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला असून या अवैध व्यवसायांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वय साधून अशा धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिंडोरी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाके उभारणे,संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींची दखल घेत प्रांत अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी संबंधित सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीत पोलीस प्रशासनासह महसूल,पंचायत समिती,नगरपंचायत आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेतले जातील,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.यावेळी शहर व परिसरातील माजी सैनिक , सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, सामान्य नागरिक,महीला,युवती व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“दिंडोरी शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी गंभीर आहेत. या सर्व बाबींची प्रशासनाने दखल घेतली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सोमवारी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.बैठकीत पोलीस प्रशासनासह इतर विभागांशी समन्वय साधून अवैध धंद्यांवर कारवाई,गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील.”
- डॉ. आप्पासाहेब शिंदे -
प्रांताधिकारी,दिंडोरी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा