Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२६

"स्त्रि " तिच्या मेहनतीने सर्व घराला पुढे आणते,डॉ.पवार, पुरुष व महिला यांची सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती





बापू चव्हाण दिंडोरी 

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे महिला दिनानिमित्त नाशिक येथील नामवंत हृदयविकार तज्ञ डॉ. हिरालाल पवार यांचे व्याख्यान आयोजित केले होते.यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांच्या आरोग्य बाबत जागृती निर्माण होऊन आजाराचे वेळेत निदान व्हावे प्रामुख्याने शेती व रोजंदारी करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे अनेकदा महिलांकडून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते महिला व पुरुष यांच्या आरोग्य सुदृढ कसे होईल याविषयी माहिती दिली.
      
यावेळी डॉ.पवार यांचा पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श शाळा ग्रामपंचायत लक्ष्मण पाटील माध्यमिक विद्यालय यांच्यावतीने तसेच शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष सागर पाटील समाधान फुकट,अनिल मातेरे तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ संधान संदीप शिंदे,लता गटकळ,सुरेखा संधान,यांनीही सत्कार केला. 
          डॉ.पवार पुढे म्हणाले की हृदयविकाराचे लक्षण म्हणजे बीपी व शुगर यांची अधून मधून तपासणी करणे शरीराचा इन्शुरन्स काढला पाहिजे निरोगी असाल तर जास्त आयुष्य जगू शकतो आपल्या शरीराची आपणच स्वतःहून काळजी घेतली पाहिजे छातीत जळजळ होणे हात दुखणे खांदा दुखणे हे हृदयविकाराचे लक्षणे आहे मनुष्याला हृदयविकाराचा झटका आला तर त्यावर प्राथमिक उपचार म्हणून सी पी आर त्याला जागेवरच दिला पाहिजे याशिवाय त्यांनी सीपीआर चे प्रात्यक्षिक करून दाखविले हृदय बंद पडत असेल तर लगेच सीपीआर दिला तर हृदय सुरू होऊ शकते आणि मनुष्याचे प्राण वाचू शकतात 
 ओंजीओ जिओग्राफीची शूटिंग केली जाते व ती सीडी बनवली जाते आपल्या हृदयाचे कोणत्या ठिकाणी ब्लॉकेज आहे हे आपण 
बघू शकतो आपल्या रोजच्या आहारात तेलाचे प्रमाण कमी असावे अधून मधून शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल मोहरी तेल आलटून-पालटून वापर करावा असे सांगितले. 
    
या प्रसंगी उपसरपंच सुरेखा संधान, समन्वयक प्रदीप भोज, संगीता घिसाडे,मुख्याध्यापिका सुनंदा भंडारे,डॉ.योगेश गोसावी,डॉ.चित्रा, डॉ.जनार्दन पवार,ग्रामविकास अधिकारी अभिजीत तुपे, विजय पाटील,पंढरीनाथ संधान,विनय गटकळ,आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले.आभार शिवानंद संधान यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध