Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १५ मार्च, २०२६

निवडणूक आयोगाच्या सुचणेनुसार मॅपिंगचे काम सुरु करा – प्रांत शेलार यांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्वेक्षकांना सूचना



बागलाण प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरीक्षण करण्यासाठी बागलाण मतदार संघातील २८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रीयस्तरीय पर्वेक्षक यांची नुकतीच आढावा बैठक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बागलाण महेश शेलार यांचे अध्यक्षतेखाली व तहसीलदार बागलाण कैलास चावडे यांचे उपस्थितीत पार पडली.

सदर बैठकीमध्ये विशेष सखोल पुननिरीक्षणाच्या पूर्वतयारी च्या अनुषंगाने मतदार यादीतील अस्पष्ट फोटो बदलणे व दुरुस्त करणे, मयत मतदार वगळणी करणे, डी - एस इ - पडताळणी करणे, २०२४ च्या मतदार यादीत २००२ ची मतदार यांची मॅपिंग करणे, बीएलओ ॲप वर ऑनलाईन मॅपिंग करणे, प्रत्यक्ष यादीत नाव न सापडल्यास किंवा इतर मतदारसंघात सदर मतदाराचे नाव असल्यास सदरचे नाव ऑनलाइन शोधणे याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले.या कामासाठी सर्व कर्मचार्यांना रंगीत मतदार यादी पुरवली जाणार आहे. सदर मतदार यादीत दुरुस्ती करणेकामी फॉर्म – ८ भरून करता येणार असल्याची माहिती देण्यात आली.
विशेष सखोल पुननिरीक्षणात मतदाराच्या आई – वडील, आजी – आजोबा यांच्या नांवाच्या नोदीशी मेळ बसविणे याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. 

चौकट

विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम हे मतदार यादीच्या शुद्धतेचे अत्यंत महत्त्वाचे आणि कालमर्यादित काम असल्याने सर्वांनी अत्यंत गांभीर्याने सदर काम करावे...... महेश शेलार उपविभागीय अधिकारी बागलाण.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध