Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२६
अदिवासी बहुल पट्यातील शेतकऱ्यानां मिळाला लाभ ; शेतकरी खुश सरकारचे मानले आभार
बागलाण मधील विरगांव व डांगसौदाने येथे समाधान शिबिर यशस्वी
दुसरा टप्पात १०८८ आतापर्यंत एकूण १५६८ लाभार्थी ; योजनेत बागलाण प्रथम स्थानी
सटाणा : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्वकाशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा दुसऱ्या टप्यात बागलाण तालुका अंमलबजावणी करण्याबाबत यशस्वी अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहेत. बागलाण तालुक्यातील विरगांव मंडळातील एकूण १७ गावातील नागरिक करंजाड येथील ग्राम पंचायत मंगल कार्यालय येथे तर डांगसौदाने मंडळातील १५ गावातील नागरिक तताणी शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन केलेले होते.
या शिबिरास बागलांणचे आमदार दिलीप बोरसे तसेच उपविभागीय अधिकारी महेश शेलार, बागलांणचे तहसीलदार कैलास चावडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार रविद्र पाटील, भूमी अभिलेख उपाधीक्षक देवेन्द्र भावसार, निवासी नायब तहसिलदार सचिन मारके तसेच सटाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भेय्या सावंत, अतुल पाटील, माजी सभापती तुकाराम देशमुख, करंजाड सरपंच अरुण देवरे, तताणी सरपंच गजानन ठाकरे, पिंगळवाडे सरपंच लताबाई भामरे, त्याचबरोबर महसूल विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे सर्व अधिकारी - कर्मचारी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळेस विरगांव येथे ८२५ व डांगसौदांने येथे २६३ इतक्या नागरिकांना घरकुल वाटप, रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई – मोजणी, ॲग्रीस्टॅक, दाखले , जातींचे दाखले, नॉन – क्रीमीलेयर, जिवंत सातबारा उतारे , प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती,लोकसेवा हक्क कायदा, विविध नोंदी , विविध सामाजिक अर्थसहाय्य योजना ,शासकीय विहीर वाटप, निराधार गावातील सर्व शेतकऱ्यांना ,नागरिकांना विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला यात अनेक नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना चावीचे वाटप करण्यात आले. एकूण १०८८ वाटप करण्यात आले. दोन टप्यात एकूण १५६८ इतक्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या कार्यक्रमात दोन्हीही गावातील सरपंच, उपसरपंच, महिला बचत गट, जेष्ठ नागरिक पोलीस पाटील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थिती नोंदवली.
तसेच विविध योजना इत्यादी सर्व महसुली दाखल्यांचे अधिकाऱ्यांच्या समवेत वाटप करण्यात आले. यावेळी विरगांव व डांगसौदाने परिसरातील शेतकरी, जेष्ठ नागरिक, अंध - अपंग यांना विविध शासकीय योजनेचा लाभ एकाच वेळी मिळाल्यामुळे सर्व नागरिकांच्या चेहरावरच आंनद दिसून येत होतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजनामध्ये विविध शासकीय आणि योजनाची माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित सर्वानी शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि शासनाचे आभार मानले.
चौकट
समाधान शिबिरात योजनेत बागलाण अव्वल स्थानी
नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यात समाधान शिबिराचे आयोजन सुरु असून आतापर्यंत बागलाण मध्ये पहिला टप्पात ४८० तर दुसर्या टप्पात १०८८ इतक्या जणांना लाभ देण्यास यशस्वी ठरलेले आहेत. या शिबिरातुन आतापर्यंत दोनच टप्यात १५६८ इतक्या अभूतपूर्व आकडेवारी सह सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यास बागलाण तालुका अव्वल स्थानी दिसून येत आहेत.
1 प्रतिक्रिया
शासनाच्या या समाधान शिबिराला सर्व नागरिकाचा उसुकपुर्व लाभ मिळत असल्याने तालुक्यातील एकूण १७२ गावातील नागरिकांना यात लाभ मिळून देण्यासाठी आम्ही सर्व शासकीय यंत्रणा कटिबंध आहोत. उर्वरित शेतकऱ्यांनी या समाधान शिबिरातून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. - महेश शेलार,
उपविभागीय अधिकारी बागलाण
2 प्रतिक्रिया
समाधान शिबिराचे अचूक नियोजनामुळे प्रत्येक लाभार्थी परत पोहचणे आम्हाला शक्य होत आहे. सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की, या शिबिरातुन लाभ मिळविण्यासाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी अथवा मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क किवा जाऊन नोदणी करावी.
-कैलास चावडे,
तहसीलदार बागलाण
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा