Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२६
दिंडोरी पोलिसांकडून शहरातील टवाळखोर व रोड रोमिओंनच्या गैर प्रकारांना आळा
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी पोलिसांकडून गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिंडोरी शहरात वाढलेल्या टवळखोरांच्या व रोड रोमिओंच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दिंडोरी पोलीसस्टेशने कठोर पावले उचलले असून यामध्ये नव्यानेच रुजू झालेले दिंडोरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गस्त वाढवली असून रोड रोमिओं व टवाळखोर यांच्यावर कडक नजर ठेवून कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे रोमिओंची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये महिला पोलीस दल कार्यरत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. गस्तीदरम्यान विद्यालय,बस स्टॉप, शाळा, कॉलेज,मंदिरे,हॉटेल्स या ठिकाणी ही रोडरोमिओंची चौकशी सुरू केल्याने त्यांच्यामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.याशिवाय तरुण तरुणींना थांबवून त्यांची ही चौकशी केली जात आहे व त्यांना आवश्यक त्या ठिकाणी समज देण्यात येत आहे.कॉलेजच्या वेळेत महाविद्यालयात न जाता शहरामध्ये अनेक ठिकाणी वेळ घालवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही चौकशी केली जात असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे व विशेषता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून स्वागत केले जात आहे.या उपक्रमांमध्ये स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पुढाकार घेतला असून टवाळखोर व रोडरोमिओंची यापुढे गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा