Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
माजी सैनिकांचे देशसेवेसाठीचे योगदान अमूल्य”,श्रीराम शेटे
बापू चव्हाण दिंडोरी
कार्यरत सैनिक आणि माजी सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेले योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन श्रीराम शेटे यांनी केले.
दिंडोरी तालुका माजी सैनिक संघ परिवाराच्यावतीने कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्नेहसंमेलन मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शेटे म्हणाले,“देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या वीरांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.कारखान्याच्या माध्यमातून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल.”तसेच शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षता हे गुण समाजाने माजी सैनिकांकडून आत्मसात करावेत,असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १९७१ च्या भारत-पाक युद्ध १९७१ मधील पराक्रमी योद्धा विश्वनाथ कावळे हे ८० व्या वर्षी व्हीलचेअरवर उपस्थित होते.व्यासपीठावर यावेळी वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव,माजी सैनिक संघ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भारत खांदवे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता तसेच शहीद यशवंत ढाकणे व शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.संघाचे संस्थापक भारत खांदवे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत माजी सैनिकांच्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले.सहाय्यक
पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी मनोगतात माजी सैनिक राष्ट्राचे खरे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. “सीमांवर कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेले धैर्य व त्याग आदर्शवत आहे.कायदा व सुव्यवस्था राखताना आम्हालाही त्यांच्या शिस्तबद्ध जीवनातून प्रेरणा मिळते,”असे त्या म्हणाल्या.युवकांनी देशभक्तीची भावना जोपासून राष्ट्रसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी सैनिकांच्यावतीने मेजर संजय ठुबे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ कावळे यांनी १९७१ च्या युद्धाच्या आठवणींना उजाळा देत देशसेवा हीच सर्वोच्च कर्तव्य असल्याचे अधोरेखित केले.तरुण पिढीने राष्ट्रप्रेम,शिस्त व सामाजिक बांधिलकी जपावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन,संचालक,सचिव, अधिकारी तसेच जेष्ठ माजी सैनिक विजयसिंह शिंदे,मेजर गणपतराव जाधव,दत्तात्रय जाधव,सौ.वैशाली वाघ,सौ.पूजा खांदवे आदींसह सुमारे १०० सदस्य उपस्थित होते.सैनिक मित्र पुरस्कार प्रदान माजी सैनिक संघ परिवाराच्या वतीने दिला जाणारा “सैनिक मित्र पुरस्कार” यावर्षी एसबीआय बँकेचे कर्मचारी विलास जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक संघ परिवाराने कादवा सहकारी साखर कारखान्यास प्रत्यक्ष भेट देऊन साखर निर्मिती प्रक्रिया व इथेनॉल प्रकल्पाची माहिती घेतली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संतोष कथार यांनी केले.पदाधिकाऱ्यांच्या विशेष परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा