Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ मार्च, २०२६

करंजाळी ते भवानीनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे




माधव खाबिया 

दिंडोरी तालुक्यातील करंजाळी ते भवानीनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या बाबत करंजाळी ग्रामस्थानी तहसील कर्यालयात निवेदन दिले असून सदरील रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत उपविभाग दिंडोरी च्या वतीने सुरु असून सदरील कामाचे अंदाजपत्रक 2 कोटी असून देखील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे तरी रस्त्याच्या कामाची तात्काळ पाहणी होऊन कामाची क्वालिटी चेक करावी व संबंधितावर कडक कारवाई करावी याबाबत सरपंच चेतन माळेकर,पुंडलिक गांगोडे, रामदास सताळे,रमेश माळेकर, दशरथ पागे,प्रकाश सताळे, युवराज माळेकर, दीपक सताळे, यांच्या सह्या आहेत.


रस्त्याचे काम निकृष्ट असल्याबाबत करंजाळी येथील ग्रामस्थाना भेट देऊन अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ दर्जेदार न बनविल्यास तसेच कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास ग्रामस्थ्यांकडून मोर्चा काढण्यात येईल त्यास माझा पाठिंबा राहील 
      प्रेम गांगुर्डे -  भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सेलचे सरचिटणीस 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध