Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ मार्च, २०२६
चिमठाणे-शेवाडे रस्त्याच्या निकृष्ट कामावरून गावकऱ्यांचा रास्ता रोको
मंत्री Shivendraraje Bhosale यांना थेट फोन; पोलीस निरीक्षक Dnyaneshwar Ware यांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित
चिमठाणे प्रतिनिधी :- चिमठाणे ते शेवाडे या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या निषेधार्थ चिमठाणे गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून तक्रारी केल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आज सकाळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत चिमठाणे-शेवाडे मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. आंदोलनादरम्यान नागरिकांनी थेट महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री Shivendraraje Bhosale यांना फोन करून रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत कैफियत मांडली. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक Dnyaneshwar Ware यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून रस्त्याचे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक वारे यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत स्पष्ट केले की, काम समाधानकारक झाले नाही तर संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांच्या मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
या रास्ता रोको आंदोलनामुळे चिमठाणे ते शेवाडे मार्गावर सुमारे एक ते दीड तास वाहतूक खोळंबली होती. काम निकृष्ट असल्याचा आरोप करत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा