Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
कत्तलीसाठी गोऱ्हा विकणाऱ्या तिघांना अटक
अमळनेर प्रतिनिधी : कत्तलीसाठी गोऱ्हा नेताना गो रक्षकांनी रंगेहात पकडल्याने शहरातील ताडेपुरा व तालुक्यातील वासरे येथील दोघे असे तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अविनाश भदाणे हे शाहआलम नगर मधील आयटीआय कॉलेज जवळ पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गो रक्षक सचिन महाजन , पवन बारी यांनी सांगितले की वाहन क्रमांक एम एच ५४ ओ १२२ मध्ये एक गोऱ्हा कत्तलीसाठी नेला जात आहे. त्यावेळी अविनाश भदाणे याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाने वाहन चालक याची चौकशी केली असता तो विना परवानगी ,वैद्यकीयचाचणी न करता गोर्हा वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्याचे नाव बंटी उर्फ विजय कैलास धनगर वय २२ रा ताडेपुरा असे सांगितले. गोऱ्ह्याचे मालक वासरे येथील नामदेव परमेश्वर पाटील वय ३५ व शरद रतीलाल पाटील वय २५ यांनी पैश्याची गरज असल्याने तो मोईन नावाच्या व्यक्तीला विकण्यासाठी नेत होतो असे सांगितले. पोलिसांनी चालक सह गोऱ्याच्या मालकांना अटक करून यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)ई , ११(१) ड , ११(१)फ ,११(१)क , तसेच भारतीय न्यायासंहिता कलम ३(५) प्रमाणे तर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शरद काकळीज यांनी आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीनकोठडी सूनावली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा