Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
अमळनेरच्या व्यापाऱ्यावर मिरची पावडर टाकून लूट; एक आरोपी अटकेत
अमळनेरच्या व्यापाऱ्यावर मिरची पावडर टाकून लूट; एक आरोपी अटकेत
एलसीबीची कारवाई; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध
अमळनेर : स्कुटीवरून जात असलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून साडे पाच लाख रुपयांची पिशवी लुटणाऱ्या तिघा चोरट्यांपैकी एकाला एलसीबी पोलिसांनी अटक केली आहे. मनोज मोकल (वय २५, रा. मोहाडी, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात असताना तीन जण मोटरसायकलवरून आले. तोंडाला मास्क लावलेल्या या चोरट्यांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला व त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तरीही कोठारी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्यांनी पुन्हा मिरची पावडर टाकली. यावेळी त्यांच्या जवळील साडे पाच लाख रुपयांची पैशांची पिशवी खाली पडली आणि चोरटे ती घेऊन पिंपळे रस्त्याने मंगरूळ मार्गे फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास सुरू करून पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव व निलेश मोरे यांच्या पथकाला आरोपींच्या शोधासाठी रवाना केले. शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तिन्ही आरोपींची हालचाल कैद झाली होती. त्या आधारे शोध घेतल्यावर आरोपी धुळे येथील असल्याचे स्पष्ट झाले.
🟥 एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, कॉन्स्टेबल संदीप पाटील व प्रवीण मांडोळे यांनी पुढील तपास करत आरोपी मनोज मोकल याचा माग काढला. तो नाशिक येथे असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तेथून अटक करून अमळनेर पोलीस ठाण्यात आणले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा