Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ मार्च, २०२६

पिंपळगाव बसवंत येथे पानाबाई बाफना यांचे संथारा व्रत पूर्ण; अंत्ययात्राविधी संपन्न.




माधव खाबिया सह संतोष खाबिया


जैन धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या संथारा व्रताचा स्वीकार करून पिंपळगाव बसवंत येथील आदर्श सुश्राविका श्रीमती पानाबाई मानकचंदजी बाफना (वय ८०) यांचे सोमवारी (दि. १६ मार्च २०२६) सानंद समाधी मरण झाले. त्यांच्या या आध्यात्मिक साधनेमुळे परिसरात श्रद्धाभाव व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीमती बाफना या भिकचंद जीवनकुमार बाफना यांच्या मातोश्री होत्या . तसेच विशाल, पुष्कर, विभा व गीत यांच्या त्या आजी (दादीसा) होत्या . जालना येथील सौ. राखी निलेशजी बोरा यांच्या त्या मातोश्री असून शांतीलालजी, मोहनलालजी, मदनलालजी, रमनलालजी पारसमलजी खाबिया यांच्या त्या बहिण होती . धार्मिक वृत्ती, साधी जीवनशैली आणि जैन धर्मातील नियमांचे पालन यामुळे त्या समाजात आदर्श सुश्राविका म्हणून ओळखल्या जात होत्या.
जीवनाच्या उत्तरार्धात त्यांनी पूर्ण श्रद्धेने संथारा व्रत स्वीकारले. शरीर व कषायांवर विजय मिळवत अत्यंत शांत, समाधानी अवस्थेत त्यांनी देहत्याग केला. त्यांच्या या महान साधना व तपश्चर्येला जैन समाजासह नागरिकांकडून भावपूर्ण वंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांची संथारा डोली (अंतिम यात्रा) दि. १६ मार्च रोजी  त्यांच्या पिंपळगाव बसवंत येथील निवासस्थानातून पिंपळगाव अमरधाम येथे प्रस्थान झाली असून. या महान आत्म्याच्या अंतिम दर्शनासाठी आणि वंदनासाठी भाविक व नागरिकांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध