Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
खोट्या वारस दाखल्याचा डाव उधळला; आदिवासींच्या जमिनीवर डोळा असलेल्या भू-माफियांचा प्रयत्न पुन्हा फसला
खोट्या वारस दाखल्याचा डाव उधळला; आदिवासींच्या जमिनीवर डोळा असलेल्या भू-माफियांचा प्रयत्न पुन्हा फसला
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनींवर डल्ला मारण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. शिंगावे गावातील प्रकरण ताजे असतानाच आता शिरपूर नगरपालिका हद्दीलगत असलेल्या मौजे खर्दे बुद्रुक शिवारातील आदिवासी जमिनीवर खोटा वारस दाखला तयार करून हक्क डावलण्याचा गंभीर डाव उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहुचर्चित आदिवासी जमिनीच्या वारस प्रकरणात काही भू-माफियांनी खर्दे बुद्रुक येथील संबंधित अधिकारी आणि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींशी संगनमत करून आदिवासी वारसांचा हक्क बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र, बनावट पंचनामा, खोटे जबाब आणि अर्ज तयार करून अशिक्षित आदिवासींचे अंगठे घेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत खोटा वारस दाखला तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित भू-माफियांचा डाव पुन्हा एकदा फसल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
दरम्यान, आदिवासींच्या जमिनींवर वारंवार डोळा ठेवणाऱ्या भू-माफियांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा