Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२६
Home
/
/
दिंडोरीत लॉजिंग-बोर्डिंग मालकांची पोलिसांकडून बैठक, प्रवाशांची नोंद रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचना; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा.
दिंडोरीत लॉजिंग-बोर्डिंग मालकांची पोलिसांकडून बैठक, प्रवाशांची नोंद रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचना; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच लॉजिंग-बोर्डिंगमध्ये होणाऱ्या संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी दिंडोरी पोलीस ठाण्यात आज (दि.१४ मार्च २०२६) लॉजिंग-बोर्डिंग मालक व मॅनेजर यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत लॉजिंगमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची सविस्तर नोंद अधिकृत रजिस्टरमध्ये करणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या.संबंधित प्रवासी कोणत्या ठिकाणचा आहे,तो कशासाठी आला आहे,मुक्कामाची वेळ व इतर आवश्यक माहिती प्रवाशांकडून स्वहस्ताक्षराने रजिस्टरमध्ये लिहून घेण्याचे निर्देश देण्यात आले.यामुळे संबंधित व्यक्तीची इतंभूत माहिती उपलब्ध राहून कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना सहज मिळू शकणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच या नोंदीमुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यावर वेळीच कारवाई करणे सोपे होईल,असेही पोलिसांनी स्पष्ट केले. नियमांचे पालन न केल्यास संबंधित लॉजिंग-बोर्डिंग मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान,या बैठकीला दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ८ ते १० जबाबदार लॉजिंग-बोर्डिंग मालक व मॅनेजर उपस्थित होते.पोलिसांच्या या सूचनांमुळे शहरातील लॉजिंग-बोर्डिंग व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा