Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२६
उमराळे बु.येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी, नागरिकांची पिंजरा लावण्याची मागणी.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे प्रकाश रघुनाथ केदार यांच्या राहत असलेल्या शेतामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून या वासराला जखमी केले या वासराचा ओरडण्याचा आवाज आल्याने वस्तीवरील परिसरातील झोपलेले नागरिक जागे झाले त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून या बिबट्याला पळून लावले. हल्ला करून पळालेल्या या बिबट्याने वासराला मोठी जखम केली आहे.
सध्या या जखमी वासरावर उपचार सुरू आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने नागरिकांमध्ये कायम भीतीचे वातावरण असते.याआधीही काही तरुणांवर बिबट्याकडून हल्ला झाला असल्याने वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी शेतकऱ्यांनी केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा