Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२६
ऑपरेशन शोध-३ दरम्यान दिंडोरी पोलिसांनी शोधल्या २०२० पासूनच्या बेपत्ता मुली व महिला
बापू चव्हाण दिंडोरी
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर ऑपरेशन शोध-३ या मोहिमेच्या अनुषंगाने सण २०१५ आजपावेतो च्या बेपत्ता मुलींचा व महिलांचा शोध घेण्याकरिता दिंडोरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोपान राखोंडे, विश्वनाथ काकड,सोनाली कराड, प्रकाश गायकवाड यांचे पथक तयार करून २०१५ पासून बेपत्ता व मिळून न आलेल्या महिला व मुलींची लिस्ट तयार करून त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर पथकाने दि.६/३/२०२६ रोजी पासून ते आजपावेती एकूण २६ बेपत्ता महिलांपैकी १४ महिलांचा शोध घेऊन त्या त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्या आहे. त्यापैकी सन २०२० पासून ते आज पवेतो मिळून न आलेल्या महिला व मुली अशा एकूण २६ असून त्यापैकी दि.६/०३/२०२६ ते आजपवेता सन २०२० ची १ महिला सन २०२१ ची १ महिला सन २०२३ च्या ३ महिला सन २०२४ च्या ३ महिला सन २०२५ च्या ४ महिला व सन २०२६ च्या २ महिला अशा एकूण १४ महिलांचा अवघ्या नऊ दिवसात शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेल्या आहे. यामध्ये विशेष म्हणजे सण२०२० ची ६ वर्षपूर्वी ची मिसिंग असलेली महिला हिचा शोध घेऊन तिस तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहे तरी मिसिंग महिला किंवा मुली याबाबत आपणास अधिक माहिती हवी असल्यास दिंडोरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा