Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
Home
/
/
पालखेड बंधारा जीप प्राथमिक शाळेला सामाजिक अंकेक्षण ऑडिटर यांची भेट, शाळेतील संविधाना बाबत समाधान व्यक्त
पालखेड बंधारा जीप प्राथमिक शाळेला सामाजिक अंकेक्षण ऑडिटर यांची भेट, शाळेतील संविधाना बाबत समाधान व्यक्त
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेचे सामाजिक अंकेक्षण चालू आहे. त्यामध्ये दिंडोरी तालुक्यातील सहाव्या टप्प्यात,३१ शाळांची निवड करण्यात आली होती. या ३१ शाळांमध्ये सामाजिक अंकेक्षण ऑडिटर यांनी दि.३ मार्च व ४ मार्च रोजी सहाव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत ऑडीटर राणी पवार विजय असो यांनी दोन दिवसाच्या कालावधीमध्ये निवासी थांबून शाळेच्या दैनंदिन कामाबरोबरच शालेय भौतिक सुविधा विविध अनुदाने गुणवत्ता दिव्यांग विद्यार्थी तसेच शालेय समिती अभिलेख हे आर्थिक सर्व बाबी शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी गुणवत्ता शाळा व शालेय स्वच्छता मुला-मुलींचे स्वच्छतागृह पोषण आहार पिण्याची पाणी व शालेय उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन चर्चा केली यामध्ये श्रीमती पवार व श्रीमती सोळसे यांनी सांगितले की या शाळे मध्ये बरेच वेगळेपण आम्हाला जाणवले याशिवाय शालेय समिती व शिक्षकवृंद यांच्यामध्ये असलेला एकोपा याविषयी समाधान व्यक्त केले व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले.एवढ्या मोठ्या शाळेत अगदी थोड्या प्रमाणात त्रुटी आहे त्या नक्कीच शालेय समिती व शिक्षक वृंद भरून काढतील असा आशावाद त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त शाळेची नवीन इमारत होत असल्याने त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण तज्ञ बापू (तात्या) चव्हाण यांनी शाळेविषयी माहिती देऊन श्रीमती राणी पवार यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने बापू (तात्या) चव्हाण उपसरपंच बबलू गायकवाड शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पीठे उपाध्यक्ष लहानु वाघ सदस्य अन्वर सय्यद,धनराज महाले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर श्रीमती विजया सोळशे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य अश्विनी चव्हाण कविता कडाळे,मनीषा हेंद्रे,आरती सोळसे,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बापू (तात्या) चव्हाण यांनी शाळेच्या विकासासाठी स्मार्ट बोर्ड कॉम्पुटर लॅब मदतीची मागणी केली. यावेळी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर वायाळ व शालेय समिती सदस्य कविता कडाळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीमती पवार व श्रीमती सोळसे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांनी केले.सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार दिलीप झुरडे यांनी मानले.याप्रसंगी गोविंद ढेपले,प्रशांत विसपुते,रवींद्र काकूळते,प्रदीप सावंत, प्रशांत उन्हवणे,ज्ञानेश्वर वायाळ वैशाली वाघेरे आदी उपस्थित होते
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा