Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
सेवा,समाधान आणि सुसूत्रता; शिवराज्य शिबिरातून प्रशासनाची नवी दिशा”,डॉ.शिंदे
बापू चव्हाण दिंडोरी
सेवा,समाधान आणि सुसूत्रता; शिवराज्य शिबिरातून प्रशासनाची नवी दिशा”असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या संकल्पनेतून साकारलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा १” अंतर्गत दिंडोरी उपविभागात मार्च ते मे या कालावधीत व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ तळेगाव दिंडोरी येथे उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.ते पुढे म्हणाले या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या १५ सेवा एकाच दिवशी नागरिकांना उपलब्ध करून देत प्रशासन अधिक सुसूत्र, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प आहे.दिंडोरी व पेठ तालुक्यातील सर्व मंडळ स्तरावर तसेच नगरपालिका स्तरावर समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.“सेवा देताना पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे,”असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे,सातबारा दुरुस्ती व डिजिटल ७/१२ आणि ८अ वितरण,उत्पन्न व रहिवास दाखले, जात व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्रे, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, सनद प्रणाली संदर्भातील जनजागृती, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील नोंदी अद्ययावत करणे, इ-मोजणी, अॅग्री स्टॅक व पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना विविध दाखले वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील लाभ प्रमाणपत्रे,तुकडेबंदी कायद्यांतील प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांचे वितरण तसेच‘सर्वांसाठी घरे’अंतर्गत पट्टे वाटप अशा विविध सेवांचा समावेश आहे.
दिंडोरी व पेठ तालुक्यातील नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घेऊन महसूल विभागाशी संबंधित आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत,असे आवाहन डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी केले.यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे,दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शरद शेजवळ, दिंडोरी मंडळ अधिकारी भारती रकिबे शेतकरी सहकारी संघाचे व्हा चेअरमन संतोष कथार,ग्रामसेवक अमोल शिंदे, तलाठी भोये,पोलीस पाटील रोशन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य शरद शेजवळ यांनीही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून योजनेची माहिती सांगितली.
यावेळी नागरिकांपैकी हरिभाऊ चौधरी,शाम परदेशी, दौलत ढाकणे,एकनाथ चौधरी,सुरेश घुगे आदींनी आपल्या अडचणी व शंका उपस्थित केल्या.त्यास प्रांताधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी प्रतिसाद देत अडचणी सोडविल्या जातील असे सांगितले.अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांचा समन्वय साधण्यात येत आहे.विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून शिबिराची व्यापक प्रसिद्धी करण्यात येत आहे.
यावेळी प्रास्तविक संतोष कथार यांनी केले व सूत्रसंचालन ग्रामसेवक अमोल शिंदे यांनी केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा