Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
सप्तशृंगी गडावर पालखी घेऊन जाणाऱ्या नंदुरबारच्या १८ वर्षीय भाविकाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू..
सप्तशृंगी गडावर पालखी घेऊन जाणाऱ्या नंदुरबारच्या १८ वर्षीय भाविकाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू..
कळवण प्रतिनिधी :-
चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी पालखी घेऊन पायी जात असताना, गिरणा नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पवन खंडू सोनवणे (वय १८, रा. वल्लारवाडा, जि. नंदुरबार) या तरुण भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील बेज भादवन शिवारात घडली या घटनेबाबत कळवण पोलिस
ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (रजिस्टर नंबर १६/२०२६) करण्यात आली आहे. खांदेशमधून मोठ्या प्रमाणात व उत्साहात पालख्या येत असताना ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नंदुरबार येथील वल्लारवाडा (गिरीवार गेट) येथील पवन खंडू सोनवणे हा तरुण आपल्या सहकाऱ्यांसोबत पालखी घेऊन सप्तशृंगी गडावर येत होता. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास बेज व भादवन शिवारात गिरणा नदीच्या पात्रात तो आंघोळीसाठी उतरला. यावेळी अचानक पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, पोलीस हवालदार रामदास गवळी, जयंत सोळंके, संदीप गांगुर्डे आणि महिला पोलीस हवालदार मंदा बर्डे यांनी परिस्थितीचा आढावा घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे वल्लारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा