Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
"उडता शिरपूर" च्या विळख्यात तरुण पिढी; पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की हतबलता?
"उडता शिरपूर" च्या विळख्यात तरुण पिढी; पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की हतबलता?
शिरपूर प्रतिनिधी: एकेकाळी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून नावलौकिक मिळवलेले शिरपूर शहर आणि तालुका सध्या एका वेगळ्याच आणि भयानक कारणाने चर्चेत येत आहे. अमली पदार्थांच्या, विशेषतः गांजाच्या वाढत्या प्रभावाने शिरपूरचा 'उडता पंजाब' होण्यास सुरुवात झाली असून, तालुक्यातील तरुण पिढी दारू सोडून आता गांजाच्या नशेत स्वतःला झोकून देत असल्याचे चित्र दिसत आहे.
■ पोलीस आणि तस्करांची 'साठगाठ'?
शिरपूर तालुक्यात गांजा सहज उपलब्ध कसा होतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र, यामागे पोलीस प्रशासनाची तस्करांशी असलेली 'साठगाठ' कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्याऐवजी खाकी वर्दीचा आशीर्वाद या धंद्यांना लाभत असेल, तर तरुण पिढीला वाचवणार कोण? असा जळजळीत सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
■ तक्रारदारांनाच खाकीचा 'प्रसाद'
हैरानीची बाब म्हणजे, जेव्हा एखादा जागरूक नागरिक आपल्या परिसरातील समस्या किंवा गांजा विक्रीबाबत तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातो, तेव्हा त्याला सहकार्य मिळण्याऐवजी "गुन्हा दाखल झाल्यावर बघू" किंवा "पुराव्याशिवाय बोलू नका" अशा उर्मट भाषेचा सामना करावा लागतो. अधिकाऱ्यांची ही नकारात्मक भूमिका अवैध धंद्येवाल्यांचे मनोबल वाढवणारी ठरत आहे.
■ लाखो रुपयांची 'लाखोळी' आणि बदल्यांचे राजकारण
सध्या पोलीस दलात बदल्यांचा हंगाम असून, मोक्याच्या जागा मिळवण्यासाठी लाखो रुपयांची 'लाखोळी' वाहिली जात असल्याची चर्चा आहे. जर पोलीस अधिकारी केवळ पैसा कमावण्यासाठी आणि राजकीय वरदहस्ताने पदावर येत असतील, तर त्यांना गांजा पिणारी तरुण पिढी आणि उध्वस्त होणारी कुटुंबे दिसावीत तरी कशी?
■ जिल्हा पोलीस अधीक्षयाकडे लक्ष देणार का?
जिल्ह्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
● गल्लीबोळात मिळणारा गांजा थांबणार का?
चिरीमिरी घेऊन अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?
● शिरपूरला 'नशामुक्त' करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का?
जर प्रशासनाने वेळीच डोळे उघडले नाहीत, तर 'स्वच्छ आणि सुंदर शिरपूर'ची ओळख पुसून 'नशेत बुडालेले शिरपूर' अशी नवी ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा