Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

वलखेड येथे गुरुवार दि.२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव



बापू चव्हाण दिंडोरी 

दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र वलखेड येथे चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी सूर्योदयसमयी ६:५५ वा. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
      
येथील हनुमान चौकात सुशोभीकरण करून कळसावर व परिसरात लाइटिंग करण्यात येऊन सगळीकडे भगव्या झेंडे लावण्यात येणार असून रात्री भजन व जागरणाचा कार्यक्रम होणार आहे तसेच चैत्रशुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयी ६:५५ मिनिटांनी जन्मोत्सव होऊन सकाळी ७:३० ते ९ पर्यंत रुद्राभिषेक करण्यात येणार आहे ९ ते १० वाजता ह.भ.प.निवृत्ती महाराज शिंदे यांचे हनुमान जन्मावर प्रवचन होईल त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.या सोहळा उत्सवाचा परिसरातील भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान जन्मोत्सव समिती व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध