Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ मार्च, २०२६
कोचरगाव येथे चाकू हल्ल्यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक
कोचरगाव (ता. दिंडोरी) येथे किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भरत उर्फ संतोष चिंतामण मोंढे (रा. कोचरगाव, ता. दिंडोरी) हा गावातील मारुती मंदिराजवळ आपल्या मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी पवन सुरेश लिलके (रा. कोचरगाव) हा मोटरसायकलवर तेथे आला व “रस्त्यावर का उभे आहात, हा रस्ता तुमच्या बापाचा आहे का?” अशी विचारणा करत वाद घातला.
यावरून संतोष मोंढे यांनीही प्रत्युत्तर दिल्याने आरोपी पवन लिलके याने त्यांना चापटांनी मारहाण केली. त्यानंतर “तुम्ही येथेच थांबा, मी परत येतो” असे सांगून तो तेथून निघून गेला. काही वेळाने आरोपी पवन लिलके व त्याचे वडील सुरेश पांडुरंग लिलके हे दोघे घटनास्थळी आले आणि त्यांनी संतोष मोंढे व त्यांच्या मित्रास मारहाण केली.
दरम्यान, आरोपी पवन लिलके याने कमरेला खोसून आणलेला चाकू काढून संतोष मोंढे यांच्या पोटावर व छातीवर वार केले. या हल्ल्यात संतोष मोंढे गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
स्थानिक नागरिकांनी जखमी संतोष मोंढे यांना तातडीने खाजगी वाहनाने कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र १३ फेब्रुवारीपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या संतोष मोंढे यांचा (दि. ५ मार्च) सकाळी ६.१० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पवन सुरेश लिलके व सुरेश पांडुरंग लिलके या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा