Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ मार्च, २०२६

जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न.


दिंडोरी प्रतिनिधी - माधव खाबिया 

दिंडोरी तालुक्यात पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन व इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन मार्फत वलखेड येथे दत्तकृपा कार्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीचा सन्मान करणे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी महिला स्रीरोगतज्ज्ञ डाॅ सुरेखा पवार उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांना महिला आरोग्या विषयी ,मासिक पाळी ,पोषण आहार या विषयी महिलांना सखोल मार्गदर्शन केले तसेच महिलांनी केवळ कुटुंबाची काळजी न घेता स्वतःची देखील काळजी घ्यावी तसेच स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले तसेच पंचायत समिती दिंडोरी च्या तालुका अभियान व्यवस्थापक मनिषा काशिद यांनी उद्योजकता व महिला सक्षमीकरण यात महिला बचत गट ,व्यवसाय मार्गदर्शन महिलांसाठी च्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विभागातील प्रभाग समन्वयक ज्योती बागूल देखील उपस्थित होत्या. इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन च्या प्रकल्प स्वच्छता सेतु च्या प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी यांनी देखील प्रकल्प स्वच्छता सेतु आपल्या गावा गावांत गावाच्या उज्वल भविष्यासाठी घेतलेला एक सामूहिक संकल्प आहे ,तसेच गावातील सुरक्षित पाणी पुरवठा ,पाण्याची गुणवत्ता तपासणी ,शौचालय वापराची सवय ,सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य जनजागृती या प्रकल्प स्वच्छता सेतु च्या विविध उपक्रमाबाबत महिलांसोबत चर्चा केली.
कार्यक्रमादरम्यान बचत गटातील महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात रांगोळी स्पर्धा विषय -पाणी ,स्वच्छता आणि आरोग्य, गमतीदार प्रश्नमंजुषा तसेच इतर मनोरंजक स्पर्धांचा समावेश होता. महिलांनी उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपली कला व कौशल्ये सादर केली. तसेच विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच महिलांना आरोग्या विषयी स्वच्छतेचे महत्व मासिक पाळी व्यवस्थापन चे साहित्य व पाणी सुरक्षा नियोजन च्या अंतर्गत पिण्याचे पाणी कसे हाताळले गेले पाहिजे याचे प्रात्यक्षिक द्वारे या संदर्भातील प्रदर्शन रूपी स्टाॅल लावण्यात आले होते. तसेच तसेच अशा विविध कला प्रदर्शनाची कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. तसेच कार्यक्रमाची सांगता ही उपस्थित सर्व महिलांसोबत स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.त्यावेळी तालुक्यातील गावातील ,सरपंच, अंगणवाडी सेविका ,बचत गट सी आर पी व ईतर महिला वर्ग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन चे वरीष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर सर यांचे मार्गदर्शन, व प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी यांची व त्यांचा फिल्ड स्टाफ तृप्ती पाटील, भाग्यश्री सोमवंशी ,ओम डोकफोडे ,गायत्री चव्हाण, सुमेध मोरे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध