Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ मार्च, २०२६

मोहाडी येथे कर्मयोगी कै.एकनाथ (भाऊ) जाधव यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिंडोरी तालुक्यातील मविप्र सभासद मेळाव्याचे आयोजन.




बापू चव्हाण दिंडोरी

   कर्मयोगी कै.एकनाथ (भाऊ) जयराम जाधव यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे दिंडोरी तालुक्यातील मविप्र सभासद मेळावा,कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेला तीन दिवसीय मोहाडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम १७ ते १९ मार्च २०२६ दरम्यान कर्मयोगी कै.एकनाथ (भाऊ) जयराम जाधव सभागृह,मोहाडी येथे दररोज सायंकाळी ६ वाजता पार पडणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी दिली.
      मंगळवार १७ मार्च रोजी कर्मयोगी पुरस्कार वितरण व म.वि.प्र.सभासद व सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील जेष्ठ सभासद संपतराव घडवजे असणार आहेत.मेळाव्याचे उद्घाटन मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून मविप्र समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,उपसभापती डी.बी. (अण्णा) मोगल,चिटणीस दिलीप दळवी,सह्याद्री प्रोड्युसर कंपनीचे संचालक विलास शिंदे तसेच कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
      या वेळी प्रा.संदीप जगताप (लोकजागृती क्षेत्र) आणि जी.एम. गायकवाड (सहकार क्षेत्र) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.बुधवार १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात के.आर.टी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अभिनव बालविकास मंदिर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,किड्स स्कूल तसेच जिल्हा परिषद शाळा मोहाडी येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके,डॉ. नितीन जाधव व प्रा.शशिकांत मोगल उपस्थित राहणार आहेत.
       गुरुवार १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुन्हा विविध कला गुणदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मविप्र शिक्षणाधिकारी प्रा.डी.डी. जाधव,डॉ.डी.डी.लोखंडे,डॉ.के.एस. शिंदे व डॉ.अजित मोरे उपस्थित राहणार आहेत.या तीन दिवसीय महोत्सवासाठी कर्मयोगी कै.एकनाथ भाऊ जयराम जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देशमुख, सरपंच सौ.आशा लक्ष्मण लहागे, उपसरपंच सौ.भाग्यश्री निखिल जाधव,ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे,विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रा.कैलास कळमकर, उपाध्यक्ष उमेश जाधव,सचिव संतोष दुगजे,शालेय व्यवस्थापन समितीचे व्ही.जे.जाधव,सुरेश सोमवंशी, रामराव जाधव,रवींद्र जाधव,के.आर. टी.हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे,सौ.सोनाली शिंदे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी,प्रा.माया वारूगसे,सौ. नीलम घुले,ज्येष्ठ नागरिक उत्तम जयराम जाधव,प्रदीप एकनाथ जाधव विशेष परिश्रम घेत आहे.
     या कार्यक्रमास दिंडोरी तालुक्यातील सर्व मविप्र सभासद, सेवक,पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन स्वागताध्यक्ष मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव व आयोजक समितीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध