Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
पाचोऱ्यात 'दृश्यम' स्टाईल थरार: अनैतिक संबंधातून प्रियकराचा काटा काढला; खून पाचोऱ्यात विल्हेवाट दोंडाईच्यात
पाचोऱ्यात 'दृश्यम' स्टाईल थरार: अनैतिक संबंधातून प्रियकराचा काटा काढला; खून पाचोऱ्यात विल्हेवाट दोंडाईच्यात
पाचोरा / दोंडाईचा : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर (वरसाडे तांडा) येथे विवाहबाह्य संबंधातून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगचा अंत अत्यंत रक्तरंजित झाला आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क दोंडाईचा परिसरात नेऊन जाळल्याचे समोर आले आहे.
अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंग ठरले कारण
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय भिमा राठोड (२५, रा. पिंपळगाव हरे तांडा) याचे संजय जाधव याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. मात्र, विजयने काही अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून तिला धमकावत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. या जाचाला कंटाळून तिने आपला पती संजय परशुराम जाधव (३५) याला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून विजयचा काटा काढण्याचा कट रचला.
*२० फेब्रुवारीला घातला खुनाचा घाट*
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपींनी विजयचा खून केला. २४ फेब्रुवारीपासून विजय बेपत्ता असल्याची तक्रार पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दाखल होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयावरून संजय जाधवला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत आरोपींनी 'दृश्यम' सिनेमातील पात्रांप्रमाणे पोलिसांना सुरुवातीला प्रचंड गुंगारा दिला. कधी गळा आवळला तर कधी शस्त्राने वार केले, असे सांगून ते तपासाची दिशा भरकटवत होते.
*दोंडाईचा येथे पुलाखाली जाळला मृतदेह*
सखोल चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली की, जळगाव जिल्ह्यात खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह दोंडाईचा (जि. धुळे) जवळील अंजनविहिरे गावाच्या शिवारात नेला. तेथील पाटाच्या चारीजवळ असलेल्या एका पुलाखालील पाईपमध्ये २१ फेब्रुवारी रोजी मृतदेह टाकून तो जाळून टाकला.
सध्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस आणि दोंडाईचा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जळालेला मृतदेह आणि हाडांचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे. धुळे पोलिसांची फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आली असून पुराव्यांचे संकलन केले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संजय परशुराम जाधव त्याच्या पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.तसेच पाचोरा न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा