Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ मार्च, २०२६

वणी पोलिसांकडून (अपहृत मुलाचा शोध)



वणी प्रतिनिधी:- सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, वणी पोलीस ठाणे कडील दाखल । गुरनं. ५६/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम- १३७(२) प्रमाणे दि. १३/०३/२०२६ रोजी १४.४१ वा. दाखल असुन सदर गुन्हयातील अपहत मुलगा नामे- शरद तुकाराम माळवे, वय-१४ वर्षे ०१ महीना १० दिवस हल्ली मु.रा. चारोसे ता. दिडॉरी जि. नाशिक, मुळ रा. विजापुर पो. छडवेल पखरूद ता. साक्री जि. धुळे हा अदयाप पावेतो मिळालेला नाही. तरी कोणाला अपहत मुलगा नामे शरद तुकाराम माळवे, वय-१४ वर्षे ०१ महीना १० दिवस याचे बद्दल काही माहीती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
असे आवाहन वणी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले

अपहृत मुलाचे नाव- शरद तुकाराम माळवे, वय-१४ वर्षे ०१ महीना १० दिवस, हल्ली मु.रा.चारोसे, ता. दिडॉरी, जि. नाशिक, मुळ रा. विजापुर, पो. छडवेल पखरूद, ता. साक्री जि.धुळे अपहृत मुलाचे वर्णन- रंगाने सावळा, शरीर-मजबुत, उंची-११० सेमी, चेहरा-गोल, केस काळे, अंगात-काळा तपकीरी रंगाचा शर्ट, निळी रंगाची जिन्स पँन्ट, भाषा-मराठी मिश्रीत हिंदी भाषा, हातात पितळी कडे, उजव्या कानात बाळी घातलेली अशा वर्नणाचा कुणाला आढळून आल्यास वणी पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा 
संपर्कासाठी १) वणी पोलीस ठाणे- ०२५५७-२२०१३३.
२) पोउनि गणेश भानुदास कुटे, ७६२०६४८८०७.
३) सहा. पोलीस निरीक्षक वणी पोलीस ठाणे- ७५८८५१६०४२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध