Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२६
माधुरी पाटील नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित
नाशिक – युनिटी फाउंडेशन, नाशिक. हि संस्था महिलांच्या सशक्ती करणासाठी काम करते. महिला दिनाचे औचित्य साधून २२ मार्च २०२६ रोजी हॉटेल सेलीब्रीट्टा नाशिक रोड येथे पार पडलेल्या भव्य दिव्य नारी शक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात मुळच्या धुळे येथील व आत्ता नाशिक यथे वास्तव्यास असलेल्या माधुरी महेश पाटील यांना या वर्षाचा नारी शक्ती पुरस्कार मराठी सिने अभिनेत्री व बिग बॉस २ फेम विना जगताप, स्टार प्रवाह वरील मालिका सावित्रीबाई फुले यांची मुख्य भूमिका साकार केलेली बाल कलाकार तक्षा शेट्टी, युनिटी फाउंडेशन च्या अध्यक्षा अॅड. एकता कदम, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या आशाताई मोरे, यांच्या हस्ते मनाचा फेटा बांधून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
माधुरी महेश पाटील या सृष्टी इन्शुरन्स सर्विसेस तसेच प्रणव टूर अॅन्ड् ट्रॅव्हल्स च्या संचालिका आहेत. त्यांनी आत्तापर्यत जीवन विमा क्षेत्रात शकडो परिवारांना सुरक्षितता प्रदान केलेली आहे. परिवार सांभाळत त्यांनी व्यवसाय स्वरुपात चांगली कामगिरी करीत सामाजिक क्षेत्रातही पती महेश पाटील यांच्या सोबत नेहमी खंबीर पणाने सोबत साथ दिली आहे. गेल्या ७ वर्षापासून आनंद नगर महिला मंडळाची स्थापना करून दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा केली जाते. पर्यावरण रक्षण व्हावे यासाठी वृक्षारोपण करणे, महिलां व मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे, तसेच मुलांना अनुदानित शाळेत मोफत शिक्षण मिळावे या मागणीसाठी शेकडो पालक व विद्यार्थ्यांसह शिक्षण मंत्री यांच्या निवास्थानाबाहेर बेमुदत उपोषण करून शकडो मुलांना मोफत शिक्षण मिळवून देण्यात ते यशस्वी ठरल्या आहेत.
त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक व व्यावसाईक कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षाचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल धुळे व नाशिक शहरातील सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
महेश एम पाटील
९०७५०४२९५५.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा