Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
आमदार मा काशीराम पावरा यांचे उपस्थितीत सावळदे ता शिरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न
आमदार मा काशीराम पावरा यांचे उपस्थितीत सावळदे ता शिरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत क्षेत्रिय स्तरावर सर्वसामान्य जनता, शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी निगडीत प्रश्नांचे निराकरण करुन सेवा देणेकामी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करणेबाबत आदेशीत केले आहे.
त्यानुसार मा. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मा सुभाष बोरकर अप्पर जिल्हाधिकारी व मा. उपविभागीय अधिकारी, शिरपूर श्री.शरद मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 14/03/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 सावळदे ता.शिरपूर येथे आयोजित करण्यात आले . सदर शिबीराचे उद्घाटन माननीय आमदार श्री काशीराम पावरा, माननीय श्री शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी शिरपूर,मा. महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी , तहसिल विभागाचे विविध शाखेचे अधिकारी/कर्मचारी, सामाजिक वनीकरण विभागाचे समन्वयक योगेश्वर मोरे, सावळदे उपसरपंच सचिन राजपूत, वाटोळे सरपंच नारायण चौधरी, कुरखडी सरपंच , गोसावी मंडळ अधिकारी, श्रद्धा जगताप तलाठी सावळदे, तसेच थाळनेर मंडळातील सर्व तलाठी शिबीराच्या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी शिबीरामध्ये देण्यात आलेले लाभ खालील प्रमाणे
• सेतु शाखा- विविध प्रकारचे उत्पन्न दाखले, डोमिसाईल दाखले - 455
• संजय गांधी शाखा- मंजुर प्रकरणे वाटप पत्र- 47
• पुरवाठा विभाग- नविन व दुबार शिधापत्रिका वाटप व -112
• 7/12 उतारे व 8 अ वाटप-85
• भुमी अभिलेख- मालमत्ता पत्रक सनद वाटप व माहिती पत्रके- 12
ट्रॅक्टर कृषी कर्ज - 6
7/12 दुरुस्ती - 18,
माती परीक्षण अहवाल - 21
सदर शिबिरात सुमारे 822 लाभार्थी यांनी उपस्थित राहुन विविध योजनांचा लाभ घेतला व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक स्टॉलला भेट देवुन जाणुन घेतली.
सदर शिबिराचे अध्यक्षही भाषणात माननीय आमदार काशीराम दादा पावरा यांनी शिबिराचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवावा यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे असे म्हटले आहे तसेच माननीय शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रास्तविकात तहसीलदार महेंद्र माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश सांगितला आणि सदर शिबिराचा लाभ सर्व थाळनेर मंडळातील विद्यार्थी,शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
शिबीर यशस्वी होणेकामी थाळनेर मंडळ भागातील सर्व तलाठी,मंडळ अधिकारी, सरपंच यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा