Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ मार्च, २०२६
दिंडोरीत भाजपचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात
बापू चव्हाण दिंडोरी
भाजप हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे.पक्षाची बांधणी ही राष्ट्र प्रथम या विचारातून झाले. पक्षामध्ये संघटनात्मक, शिस्त महत्त्वाची असून कार्यकर्त्यांनी जनसेवेला वाहुन घ्यावे,असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री शरद कासार यांनी केले.दिंडोरी येथे दोन दिवसीय पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.
त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी किसान सेलचे सरचिटणीस विलासनाना देशमुख होते.भाजपची वैचारिक बैठक ही पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडली.अटलबिहारी वाजपेयी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजतायगत सामान्य कार्यकर्त्याला मोठे करुन जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे,असे शरद कासार म्हणाले.प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील बच्छाव व माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या हस्ते झाले.पहिले पुष्प डॉ. मधुकर आचार्य यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर गुंफले. त्याचप्रमाणे प्रा. सुनील बच्छाव यांनी ‘राज्य सरकारची उपलब्धियां’,शरद कासार यांनी ‘इतिहास व विकास’, अमोल पवार यांनी ‘सोशल मीडिया एआय,नमो ऍप’, नितीन गायकवर यांनी ‘कार्यपध्दती’,सुयोग वाडेकर यांनी ‘कार्यविस्तार’,सुनिल माळी यांनी ‘बूथ व्यवस्थापन ’ या विषयावर गुंफले.जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी सांगितले की,प्रत्येक पदाधिकार्यांनी जनतेचे कामे करुन येणार्या निवडणूकीसाठी सज्ज रहायचे आहे. प्रशिक्षण वर्गातून कार्यकर्ता घडतो,असे ते म्हणाले. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सुनील बच्छाव यांनी दिली.दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षण वर्ग कार्यकर्त्यांना निवडणूक पूर्व तयारीचे धडे देण्यात आले.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी दिंडोरी भाजपचे सर्व सेल,आदिवासी मोर्चा,महिला मोर्चा, अनुसुचित जाती मोर्चा,युवा मोर्चा आदी सर्वांनी परिश्रम घेतले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा