Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ मार्च, २०२६

ननाशीत समाधान शिबिराची जनजागृती




माधव खाबिया दिंडोरी 

ननाशी (दिंडोरी ): नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित तक्रारी आणि अर्जाचे तातडीने निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे येत्या ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ननाशी येथे आढावा बैठक झाली. शिबिरात उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, ७/१२ उतारा, फेरफार नोंदी, जमीन विषयक प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज व तक्रारी जागेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ननाशी व परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तहसीलदार दिंडोरी,श्री. मुकेश कांबळे मंडळ अधिकारी स्वाती आमले, एस. आर. काकड, ग्राम महसूल अधिकारी भारती टोपले, हर्षदा गायकवाड, प्रमोद गावित, प्रदीप भिवसन, अनिल भोये यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध