Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२६

पत्नीनेच केला प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा घात - उगाव ता. निफाड येथील बेपत्ता युवकाचे खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, पत्नीनेच केला प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा घात -




माधव खाबिया दिंडोरी

दि. १८/०२/२०२६ रोजी उगाव ता. निफाड परिसरातुन युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी, वय ३०, रा. उगाव, ता. निफाड हा बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने निफाड पोलीस ठाणेस मनुष्य मिसिंग रजि. नं. १८/२०२६ प्रमाणे मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर मिसिंगचे तपासात बेपत्ता इसम शादाब तांबोळी याचा शोध सुरू असतांना, दि. २२/०२/२०२६ रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसुल गावचे शिवारात परसुली चिंचोली नदीचे पुलाखाली नदीचे पाण्यात एका इसमाचा मृतदेह मिळुन आला होता.

यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपीनी अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मयताचे दोन्ही हात नायलॉनचे दोरीने बांधुन व तोंडाला कपडयाने बांधुन तसेच कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधुन परसुल शिवारात चांदवड ते निफाड रोडवर परसुली चिंचोली नदीचे पुलाखाली पाण्यात टाकुन जिवे ठार मारून खुन केला म्हणुन चांदवड पोलीस ठाणेस गुरनं ७५/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मयताचे वर्णनावरून तो निफाड पोलीस ठाणेकडील मिसिंग मधील युवक नामे शादाब रज्जाक तांबोळी, रा. उगाव हा असल्याचे निष्पन्न झाले होते.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक . बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिस्खेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव शाबीर सिंह संधू यांनी वरील खुनाचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा, चांदवड व निफाड पोलीसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक     कैलास वाघ, निफाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक     गणेश गुरव यांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट व श्वान पथकांसह वरील गुन्हयाचे घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. यातील मयत इसम नामे शादाब तांबोळी याची मागील एक वर्षाची पार्श्वभुमी, तसेच घटनास्थळ परिसरात मिळून आलेले भौतिक व तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषणाव्दारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने खालील आरोपीतांना ताब्यात घेतले पैकी 
 ऋषभ मनोज वर्मा, वय २३, रा. चांदवड रोड, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक,शाहरूख शफिक शेख, वय २१, रा. मालेगाव नाका, मनमाड, ता. नांदगाव (मयताचा मेव्हणा), 
 युवराज विजय थोरात, वय १९, रा. मोतीबाग नाका, भिमनगर, मालेगाव, ता. मालेगाव,  सलीम साबीर शेख, वय २८, रा. आठवी गल्ली, १२७५, आझादनगर, मालेगाव, ता. मालेगाव, 
 आर्यन सुंदर जिनवाल, वय १९, रा. भिमनगर, मोतीबाग नाका, मालेगाव, ता. मालेगाव, शेख एजाज शेख रियाज, वय २९, रा. आंबेडगर नगर, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक, 
 मुस्कान शादाब तांबोळी, वय २४, रा. उगाव, ता. निफाड, जि. नाशिक (मयताची पत्नी)

यातील ताब्यात घेतलेला वरील आरोपी क. १ ऋषभ वर्मा याचे मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिचेसोबत प्रेम संबंध होते, त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करावयाचे असल्याने, आरोपी ऋषभ वर्मा व मयताचा मेव्हणा आरोपी क. २ शाहरूख शेख अशांनी संगणमत करून त्यांचे वरील इतर साथीदारांसह मनमाड येथे सोन्याचे दागिन्यांचा व्यवहार करावयाचा आहे असा बनाव करून मयत शादाब तांबोळी यास मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेले पोल्ट्री फार्म याठिकाणी त्याचे दोन्ही हातपाय नायलॉनचे दोरीने बांधुन, तोंडाला कपडयाने बांधुन, जिवे ठार मारून त्याच्या कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधुन मृतदेह हा चांदवड ते निफाड रोडवर परसुल शिवारातील नदीचे पुलाखाली पाण्यात टाकुन दिला असल्याबाबत कबुली दिली आहे.
वरील सर्व आरोपीतांना चांदवड पोलीस ठाणेकडील दाखल खुनाचे गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक   कैलास वाघ यांचे पथक करीत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक  बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक  आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव  तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग   बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग      के. के. पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक   रविंद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक     कैलास वाघ, निफाड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक      गणेश गुरव, स्थागुशाचे सपोनि नितीन रणदिवे, पोउनि प्रकाश भालेराव, सपोउनि नवनाथ सानप, पोहवा सुधाकर बागुल, प्रांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारूंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदिप राठोड, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे, प्रविण गांगुर्डे, किशोर बोडके यांचे पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध