Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२६
Home
/
/
ईद च्या पवित्र सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.जयकुमार भाऊ रावल यांनी सदिच्छा दिली भेट
ईद च्या पवित्र सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.जयकुमार भाऊ रावल यांनी सदिच्छा दिली भेट
दोंडाईचा प्रतिनिधी : रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय ना. श्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांच्या निवासस्थानी शिरखुर्मा व ईद मिलन साठी सदिच्छा भेट दिली
व कुटुंबीयांना पवित्र रमजान ईदच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या. 'रमजानचा सण हा शांतता, बंधुभाव आणि आपुलकीचा संदेश देणारा आहे असा एकच सूर आलेल्या सर्व पाहुण्यांकडून निघाला कुटुंबातील सदस्यांनी
मंत्री महोदयांचे स्वागत केले व मंत्री महोदयांनी घरच्या सदस्यांची विचारपूस करत, शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. या भेटीमुळे गरीब नवाज कॉलनी परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या भेटीदरम्यान जामा मस्जिद ट्रस्ट चे चेअरमन हाजी सुलतान पिंजारी, नगरसेवक- हितेंद्र भाऊ महाले, बांधकाम सभापती- बबलु भाऊ देवरे, नगरसेवक विजय भाऊ मराठे, नगरसेवक प्रविण भाऊ महाजन,पाणी पुरवठा सभापती - चिरंजीव भाऊ चौधरी,मा. नगरसेवक छोटुभाऊ मराठे, नगरसेवक कृष्णा भाऊ नगराळे, मा. नगरसेवक नरू भाऊ कोळी, मस्जिद चे चेअरमन असलम भाई बागवान, हाजि सिराजोद्दीन भाई,करीम भाई, सैयद जाकीर सर,मोहसिन शेख, साजिद शाह, फारूक मेमन, जाविद शाह, ईरफान बागवान,जाविद भाई पिंजारी, जाकीर भाई लोहार, शरीफ भाई बागवान, बिलाल भाई खाटीक, आरीफ भाई बागवान,अजहर भाई शेख,आवेस शेख, मोइन शेख, अरबाज शेख, दानिश शेख, व विद्यमान नगरसेवक व मुस्लिम समाजातील मान्यवर , युवक उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा