Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२६
गरोदर महिलेला उपचार न मिळाल्याने संताप; सांगवी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेला उपचाराविना परतावे लागले; ग्रामस्थांमध्ये संताप
माहितीनुसार, सांगवी गावातील रहिवासी पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिला २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास प्रसूतीसाठी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. मात्र त्या वेळी आरोग्य केंद्र बंद अवस्थेत होते आणि तेथे कोणताही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. फक्त सिस्टर नर्स उपस्थित असल्याचे दिसून आले.
महिलेसोबत आलेल्या नातेवाईकांनी उपचारासाठी विनंती केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस महिलेला उपचाराविना परत नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. हा प्रकार पाहून गावातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.
गावातील भटू कोकणी यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करून बोलावले. मात्र आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असूनही “डिझेल नाही” असे कारण सांगण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच प्रसूतीसाठी आलेल्या नातेवाईकांकडूनच डिझेल भरण्यास सांगितले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे सांगवी परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शेवटी महिलेला प्रसूतीसाठी शिरपूर येथे रवाना करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा