Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२६
पालखेड जि.प.प्राथमीक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
बापू चव्हाण दिंडोरी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखेड बंधारा येथे विज्ञान जत्रा आयोजित करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमन यांनी प्रकाशाचे विकिरण याचा शोध लावला तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.रोजच्या जीवनातील विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती तसेच त्यांचा वापर याविषयीचे माहिती विद्यार्थ्यांना शिक्षक अमोल पवार यांनी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी हवेला दाब असतो,घर्षण बल,ज्वालामुखी,रेन हार्वेस्टर,ऋतु,ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो असे विविध प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
याप्रसंगी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते असे मनोगत व्यक्त केले.विज्ञान शिक्षक गोविंद ढेपले,प्रशांत विसपुते यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रयोगाचे सादरीकरण केले.त्याबद्दल विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार अभिनंदन यांनी केले.याप्रसंगी गोविंद ढेपले, शिवाजी भोसले,प्रशांत विसपुते,रवींद्र काकुळते,प्रदीप सावंत, प्रशांत उन्हवणे सोनवणे,ज्ञानेश्वर वायाळ वैशाली वाघेरे,आदी सह विद्यार्थी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा