Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२६
मतदार यादी विशेष पुनरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,आप्पासाहेब शिंदे.
बापू चव्हाण दिंडोरी
भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून या प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन दिंडोरीचे प्रांतअधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.
सन २०२४ च्या मतदार यादीतील नोंदणीची पडताळणी करतांना पूर्वीच्या सन २००२ च्या मतदार यादीशी तुलना केली जाणार आहे या प्रक्रियेच्या मतदारांचे नाव २०२४ च्या यादीत आहे मात्र २००२ च्या यादीत नाही अशा नोंदणीची सखोल तपासणी केली जाणार आहे तसेच मतदारांच्या कुटुंबीयांची माहिती राहत्या पत्त्याची अचूकता आणि मूळ गावाची नोंद याचाही आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय या प्रक्रिये दरम्यान कोणत्याही मतदाराचे नाव विनाकारण वगळले जाणार नाही आवश्यक पडताळणी करूनच पुढील कारवाई केली जाईल त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही प्रांताधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी तसेच नाव नोंदणी दुरुस्ती किंवा बदल आवश्यक असल्यास संबंधित अर्ज तातडीने सादर करावेत असे आवाहन ही करण्यात आले आहे. ही विशेष पुनरीक्षण प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरूच राहणार असून त्यानंतर मतदार यादी अद्ययावत नियमित प्रक्रिया सुरूच राहणार आहे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आवश्यक असल्याचे डॉ.शिंदे यांनी नमूद केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा