Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
दिंडोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर गुन्हा, २२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त.
दिंडोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांवर गुन्हा, २२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त.
नाशिक प्रतिनिधी:-दिंडोरी शहरातील जुन्या कळवण रोड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिंडोरी पोलिसांनी छापा टाकत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईलसह एकूण २२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास जुन्या कळवण रोडवरील युगा फॅशन कपडे दुकानासमोरील मोकळ्या जागेत काही जण पैशांवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. छाप्यादरम्यान काही जण पैशांची पैज लावून जुगार खेळताना आढळून आले.
या प्रकरणी बाजीराव संपत बर्डे (वय ५०), लिंबाजी सेनाजी गायकवाड (वय ४५), महेंद्र पुंडलिक पगारे (वय ४३), धनशेवर धर्मदेव मांजी (वय ४२) आणि पुंजा नामदेव गायकवाड (वय ५४) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून जुगारासाठी वापरली जाणारी रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख पैसे आणि मोबाईलचा समावेश असून त्याची एकूण किंमत २२,३४० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अशा प्रकारच्या अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्पष्ट केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा