Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

सिन्नर पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी सराईत चोरटयास अटक चोरीचा मोबाईल व ०२ मोटारसायकल हस्तगत.



     संदीप अवधूत :-
सिन्नर पोलीस ठाणे हददीत मोटर सायकल चोरी व घरफोडी चोरीच्या वाढत्या गुन्हयांबाबत प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटिल सो यांनी उघड गुन्हयांचा आढावा घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक अदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार भामरे, पोलीस निरीक्षक, सिन्नर पोलीस ठाणे यांना सुचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सिन्नर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड यांना नाउघड मोटर सायकल चोरीचे तपास करणेबाबत सुचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार मोटर सायकल चोरी व घरफोडी चोरी गुन्हयांचा तपास करीत असतांना पोनि हेमंतकुमार भामरे, सिन्नर पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गोरख बाळु पिंपळे रा. गुरेवाडी ता सिन्नर हा सिन्नर येथे मोटर सायकल चोरी करण्यासाठी आलेला असुन तो सध्या सिन्नर शहरातील सरदवाडी रोड परिसरात आलेला आहे. अशी खात्रीशिर बातमी समजल्याने त्यावरून सदर पथकाने सरदवाडीरोड परीसरात सापळा रचुन संशयीत इसम नामे गोरख बाळु पिंपळे, वय ३५वर्ष, रा-झापवाडी, लोटसशाळेजवळ, सिन्नर ता-सिन्नर, जि- नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचेकडेस विचारपुस केली असता त्याचेकडे एक विनाक्रमांकाची प्लॅटीना मोटारसायकल मिळुण आली सदर मोटारसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही त्याचा भाऊ बाळा पिंपळे याने चोरी करून आणुन दिलेली असलेबाबत सांगितले.यातील आरोपी नामे गोरख बाळु पिंपळे, वय ३५वर्ष,रा-झापवाडी, लोटस शाळेजवळ, सिन्नर ता-सिन्नर, जि- नाशिक याच्या कब्जातुन खालील प्रमाणे चोरीची ०१ मोटर सायकल, ०१ रेडमी कंपनीचा मोबाईल, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकुन ६०,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन सिन्नर पोलीस ठाणेस दाखल असलेला । गुरनं २०५/२०२६ भान्यासंक ३०३(२) प्रमाणे दाखल असलेला चोरीचा ०१ गुन्हा उघडकीस आलेला आहे. यातील आरोपीतावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, मोटारसायकल चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहे.
सदर आरोपीतावर आता पर्यंत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.१) वावी पोलीस स्टेशन गुरनं १८८/२०२२ भादविक ४५७, ३८०
२) वावी पोलीस स्टेशन गुरनं १४९/२०२२ भादविक ३९५
३) वावी पोलीस स्टेशन गुरनं २४७/२०२२ भादविक ३९५,३९७, ४) सिन्नर पोलीस स्टेशन गुरनं २०२/२०२२ भादविक ३७९,
५) वाडीव-हे पोलीस स्टेशन गुरनं १५३/२०२२ भादविक ३७९,
६) मनमाड पोलीस स्टेशन गुरनं १७४/२०२२ भादविक ३७९ असे गुन्हे दाखल आहेत
नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधिक्षक अदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील सो यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे, यांचे पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणुन कामगीरी केलेली आहे. पुढील तपास पोहवा हेबांडे हे करत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध