Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

जय बजरंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा.



    संदीप अवधूत :-

हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो चैत्र पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला त्यांना भगवान शिवाचा ११ वा रुद्रावतार मानला जातो हनुमानजींना बुद्धी, शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीकही मानले जाते, तसेच त्यांना 'संकटमोचन' म्हटले जाते हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत जय हनुमान जन्मोत्सव प्रसंगी कसबे वणी येथील दत्तनगर मधील जय बजरंग गणेश मित्र मंडळाच्या वतीने मारुतीरायाची विशेष पूजा, 'हनुमान चालीसा' पठण, सत्यनारायण पूजा करण्यात आली तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वणी ग्रामपंचायत चे प्रथम लोकनियुक्त सरपंच मधुकर हरीभाऊ भरसट, पंडित किसन गायकवाड,नामदेव पांडुरंग गवळी,उत्तम मुरलीधर राऊत,पद्माकर पुंडलिक राऊत,विजय गायकवाड,सुरेश भरसट,भागाजी गायकवाड, कैलास भरसट, रामदास राऊत, संजय भरसट, दिलीप राऊत, यशवंत चौरे,वसंत चौरे, मुरलीधर राऊत, यशवंत भरसट, प्रकाश गावित, गोविंद महाले, लक्ष्मण बोंबले, मोतीराम गावित, देवराम गायकवाड, अशोक गायकवाड,व बजरंग युवक मित्र मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने हनुमान जन्मोत्सव आनंदात गुण्यागोविंदाणे पार पडला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध