Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२६
शिरपूर येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
शिरपूर प्रतिनिधी:- आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आदर्श नगर, भोई गल्ली येथील भोईराज भवन येथे शिरपूर-वरवाडे नगरपरिषद व जनआरोग्य समिती तर्फे माननीय मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे साहेब आणि आरोग्य सभापती डॉ. वृषाली बडगुजर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री. चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्षा सौ. संगीताताई देवरे, मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी श्री. संजय हसवाणी, तालुका आरोग्य अधिकारी श्री. राष्ट्रपाल अहिरे, डॉ. सौ. नीतू बत्रा मॅडम, नगरपालिकेचे भगवान भामरे, माननीय श्री. गोपाल भंडारी व माननीय श्री. कृष्ण शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, यापुढेही जनआरोग्य समितीच्या माध्यमातून शिरपूरकरांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आरोग्य सभापती डॉ. सौ. वृषाली बडगुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सर्वसामान्य व गरजू रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, भविष्यात शहरातील विविध भागांत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. तालुका वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी यावेळी HPV लसीबाबत (HPV Vaccine) महत्त्वपूर्ण माहिती दिली.
नगराध्यक्ष श्री. चिंतनभाई पटेल यांनी जनआरोग्य समितीतील सर्व डॉक्टर, नर्सेस व आशा वर्कर्स यांच्या कार्याचे कौतुक केले. या शिबिरात प्रभाग
क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक, विशेषतः महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सुमारे 250 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व रक्त चाचण्या करण्यात आल्या.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सभापती डॉ. सौ. वृषाली बडगुजर, मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी श्री. संजय हसवाणी, डॉ. नीतू बत्रा मॅडम, डॉ. अतुलजी बडगुजर, श्री. भगवान भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरासाठी भोई समाजाने भवन उपलब्ध करून दिले.
या वेळी नगरसेवक हर्षल भाऊ राजपूत, भोई समाजाचे माजी शिक्षण सभापती सी. एम. भोई सर, धुळे जिल्हाध्यक्ष भाईदास भोई, नगरसेवक सरलाल भोई, माजी तालुका अध्यक्ष सुभाष भोई, जिल्हा सचिव भोजराज भोई, उत्सव समिती अध्यक्ष हरीश भोई, राजू किसन भोई, राजेश्वर शिवदे, प्रभाकर शिवदे, अरुण भोई, संतोष भाऊ भोई (पत्रकार), गुलाब भोई, माजी नगरसेवक श्रीकृष्ण शर्मा, शिक्षण मंडळ सदस्य सिद्दीकी भाई तेली, जिओ पाटील सर, मुरलीधर स्वर्गे सर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा