Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

वडनेर खाकुर्डी परिसरातील अवैध हातभ‌ट्टीचे दारू अड्‌ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे.


संदीप अवधूत :-

नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू असलेले हातभट्टीचे दारू अड्ड्यांवर सत्वर कारवाई करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेश दिलेले आहे.त्यानुसार दि. २९/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे पथकांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत काष्टी गावचे शिवारात मोसम नदीचे किनारी काटेरी झाडा-झुडपांमध्ये अवैधरित्या सुरू असलेले हातभट्टीचे दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केलेली आहे. सदर छाप्यामध्ये हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणरे नवसागर मिश्रीत रसायन व साहित्य साधने असा एकुण २,०२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदर छापा कारवाईत इसम नामे १) विष्णु अशोक सोनवणे, रा. काष्टी, ता. मालेगाव, २) केदा तुळशीराम गायकवाड, रा. काष्टी, ता. मालेगाव यांनी पोलीसांची चाहुल लागताच पलायन केले आहे. सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या हातभ‌ट्टी लावून गावठी दारू करतांना मिळून आले असून त्यांचेविरूध्द वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क) (फ) (ड) प्रमाणे ०२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
अतिदुर्गम भागात हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दुषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणा-या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. जिल्हयात अशा प्रकारचे गावठी दारू हातभ‌ट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलीसांना तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउनि दत्ता कांभिरे, पोहवा सुभाष चोपडा, दत्ता माळी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध