Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२६
शाळा पूर्वतयारी मेळाव्यात चिमुकल्यांचा सेल्फी काढून प्रवेश निश्चित.
बापू चव्हाण दिंडोरी:-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल ते जून २०२६ या काळात राज्यभरातील ६५ हजार सरकारी शाळांमध्ये "पहिले पाऊल" हे शाळा पूर्वतयारी अभियान राबवले जात आहे.
या अंतर्गत माता गटांच्या मदतीने मुलांचे शारीरिक,मानसिक व भावनिक कौशल्य वाढवण्यासाठी दोन टप्प्यांत मेळावे आयोजित केले जातील,ज्यामुळे विद्यार्थ्यांची आनंददायी शाळा प्रवेशासाठी पूर्वतयारी होईल शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये भिती कमी होईल,शिकण्याची आवड निर्माण होईल या अनुषंगाने दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्वर सैय्यद मुख्याध्यापक प्रविण खैरनार हे होते.
प्रथमता मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू (तात्या) चव्हाण व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व फीत कापून करण्यात आले.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६ -२०२७ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणारे दाखल पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून स्टॉलला भेट देणाऱ्यांना बोलके करून शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील शिक्षकांनी नाव नोंदणी , शारीरिक विकास,बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास,गणन पूर्वतयारी, समुपदेशन असे स्टॉल शाळेचे शिक्षक संजय सोनवणे,गोविंद ढेपले, प्रशांत विसपुते,शिवाजी भोसले, प्रश्नांत उन्हवणे,दिलीप झुरडे,अमोल पवार,ज्ञानेश्वर वायाळ,प्रदीप सावंत रविंद्र काकुळते,वैशाली वाघेरे यांनी मांडले होते.याप्रसंगी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी तर आभार संजय सोनवणे यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा