Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२६

दिंडोरी येथे शहीद प्रसाद क्षिरसागर यांना वाढदिवस स्मरणार्थ माजी सैनिकांकडून मानवंदना.





माधव खाबिया दिंडोरी 

       दिंडोरी येथे आज शनिवार दि.११ रोजी येथील शहीद प्रसाद क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ व क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तालुका माजी सैनिक परिवाराच्यावतीने प्रसाद शिरसागर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मारकावर जाऊन माजी सैनिकांनी मानवंदना दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ.माधवी गोसावी यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.
      यावेळी स्मारक संरक्षण पुरस्कार म्हणून स्मारकाची देखभाल करीत असलेल्या श्रीमती संध्याताई निरगुडे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन डॉ. माधवी गोसावी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच अखिल भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक जिल्हा नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिंडोरी तालुक्याच्या मेजर वैभव भार्गवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचाही माजी सैनिकांच्यावतीने मेजर गणपत कोरडे यांनी सन्मान केला. त्यानंतर प्रसाद शिरसागर यांच्या स्मरणार्थ खुशीराज आश्रम शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे बापू (तात्या) चव्हाण वीरमाता मंजुषाताई क्षीरसागर उपस्थित होते. प्रथमतः दत्तात्रय जाधव व माजी सैनिक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून पेन,टॉवेल,व बिस्कीट पुडे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.भारत खांदवे मेजर यांनी प्रस्तावित केले. भारत भार्गव मेजर यांनी महात्मा ज्योतिबा फुले व कार्यक्रमाविषयी माहिती विशद केली.तर बापू (तात्या) चव्हाण यांनी आपल्या मनोगत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन माजी सैनिकांचे व त्यांच्या उपक्रमाचे यावेळी तोंड भरून कौतुक केले. 
     याप्रसंगी जाधव मेजर चंद्रभान कळमकर,भारत नागरे,शांताराम जाधव,उत्तम बुणगे,कविताताई बैरागी,रत्ना सोनवणे,सुनीता कतवारे संगीता घिवदे,पूजा खांदवे,कल्पना पगारे,संगीता गायकवाड,आदींसह माजी सैनिक विद्यार्थी शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध