Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नसल्याने १ मे रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर चिमठाणे येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. ….
पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नसल्याने १ मे रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर चिमठाणे येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. ….
केंद्र सरकारची पी.एम.किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना मानली जाते. मात्र चिमठाणे येथील काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर शेतकरी ज्या दिवसापासून या योजनेचा प्रारंभ झाला त्या दिवसापासून कागदपत्राची पूर्तता करत आहेत. तहसील कार्यालयापासून तर कृषी विभागापर्यंत टाचा झिजवून सर्व ऑनलाइन प्रक्रिया पार पाडून वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारून देखील लाभ मिळत नसल्याने शेवटी त्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबीला आहे ..हे कृषिप्रधान देशाचे आताचे चित्र आहे.. कृषीप्रधान देशात जगाच्या पोशिंद्याला शेतीचे काम सोडून आमरण उपोषणाला बसावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव शेतकऱ्याचे नाही...श्रीमती मथुराबाई भलचंद्र गुरव, श्रीमती भिकूबाई शांताराम पाटील, श्री छोटू रामराव गागरे. हे सन्मान निधीपासून वंचित शेतकऱ्यांची नावे आहेत.सदर शेतकरी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिंदखेडा तहसील कार्यालयच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार आहेत......
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घर...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा