Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६
Home
/
/
पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची मागणी
पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची मागणी
बापू चव्हाण दिंडोरी:-
दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथे सकाळी ८.३० वा. वय वर्ष ६९ या शेतकर्यावर बिबट्याने अचानक हल्ला करुन ठार केले आहे.या घटनेमुळे पिंपळणारे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत वृत्त असे की पिंपळणारे येथील गट नंबर ३५५ मधील शेतात सकाळी ८ वाजेच्या सुमारास गुलाब रामभाऊ साळवे हे ६९ वर्षीय शेतकरी वासरू बांधत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने मुलगा जीवन गुलाब साळवे व सुन सोनाली जीवन साळवे हे धावत आल्याने बिबट्याने मात्र तेथुन धुम ठोकली. या हल्ल्यामध्ये गुलाब साळवे जमिनीवर कोसळले.त्यांना तात्काळ तळेगाव दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यानंतर त्यांना दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.वणी आणि दिंडोरी येथील वनविभागाच्या अधिकार्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनीही रुग्णालयात जाऊन पाहणी केली. घटनास्थळी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला असुन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पिंपळणारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यामध्ये सातत्याने या घटना घडत असल्यामुळे याला जबाबदार कोण? अशी म्हणण्याची वेळ तालुका वाशीयांवर आल्याने हे बिबटे अजून किती बळी घेणार हे मात्र सांगणे कठीण आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा